फ्री डाउनलोड · हिशोब
जमा खर्च वही: दुकानाचा रोजचा हिशोब, फ्री Excel आणि PDF नमुना
दुकानाची जमा खर्च वही कशी लिहावी?
रोज नवीन पान: डाव्या बाजूला जमा (पैसे आले: सुरुवातीची शिल्लक, रोख आणि UPI विक्री, उधारी वसूल) आणि उजव्या बाजूला खर्च (पैसे गेले: मालाचे पेमेंट, भाडे, पगार, लाईट बिल, चहा-नाश्ता, उचल). रोख आणि बँक / UPI वेगळं लिहा. रात्री अखेरची शिल्लक = जमा − खर्च; ती खर्च बाजूला शेवटी लिहिली की दोन्ही बाजूंची बेरीज सारखी होते, आणि रोख शिल्लक गल्ल्यातल्या मोजलेल्या रोखीशी जुळायला हवी. उधारीवर दिलेला माल रोखीत लिहू नका. खालून फ्री मराठी Excel (शिल्लक आपोआप) आणि A4 PDF नमुना डाउनलोड करा.
कार्ड नाही · ॲपमध्ये जाहिराती नाहीत · तुमची बिलं, ग्राहक आणि उधारी तुमचीच: पैसे भरले नाहीत तरी काहीही डिलीट होत नाही
जमा खर्च वही: फ्री मराठी Excel आणि PDF
| फाइल | काय आहे | डाउनलोड |
|---|---|---|
| Excel (फॉर्म्युलासह) | नोंदींची शीट (रोख आणि बँक शिल्लक आपोआप), भरलेलं उदाहरण, महिन्याचा रोजचा सारांश (गल्ल्यातला फरक) आणि एप्रिल ते मार्च वर्षाचा सारांश | Excel · 25 KB |
| A4 PDF | पान 1: एक दिवस (जमा डावीकडे, खर्च उजवीकडे), नोटांची मोजणी आणि गल्ल्याचा मेळ; पान 2: वर्षाचा सारांश आणि लिहायचे 6 नियम | PDF · 348 KB |
Excel फोनच्या Excel मध्ये आणि Google Sheets मध्येही उघडतं. पांढऱ्या चौकटीत लिहा; शिल्लक आपोआप येते. PDF छापून फाइलमध्ये लावा किंवा प्रेसमध्ये वही बनवून घ्या.

उदाहरण: एका दिवसाची जमा खर्च वही
पुण्यातल्या साडीच्या दुकानाचा एक दिवस (काल्पनिक आकडे). सकाळी गल्ल्यात ₹5,000 आणि बँकेत ₹42,000 होते:
| तपशील | जमा: रोख | जमा: बँक / UPI | खर्च: रोख | खर्च: बँक / UPI |
|---|---|---|---|---|
| सुरुवातीची शिल्लक | ₹5,000 | ₹42,000 | ||
| विक्री, रोख (बिल 101 ते 118) | ₹18,400 | |||
| विक्री, UPI आणि कार्ड | ₹22,650 | |||
| रमेश पाटील, जुनी उधारी | ₹2,000 | |||
| चहा-नाश्ता | ₹120 | |||
| टेम्पो भाडे (माल आणला) | ₹300 | |||
| हमाली | ₹500 | |||
| श्री गणेश टेक्सटाईल्स, मालाचे पेमेंट | ₹30,000 | |||
| बँकेत रोख भरली | ₹15,000 | ₹15,000 | ||
| घरखर्चासाठी उचल (मालक) | ₹2,000 | |||
| अखेरची शिल्लक | ₹7,480 | ₹49,650 |
रोख: ₹5,000 + ₹18,400 + ₹2,000 − ₹120 − ₹300 − ₹500 − ₹15,000 − ₹2,000 = ₹7,480, म्हणून रात्री गल्ल्यात ₹7,480 असायला हवेत. बँक: ₹42,000 + ₹22,650 + ₹15,000 − ₹30,000 = ₹49,650, बँकेच्या ॲपशी जुळवा. दोन्ही बाजूंची बेरीज ₹1,05,050 (₹1,05,050). या दिवशी उधारीवर दिलेला माल असेल तर तो इथे नाही, ग्राहकाच्या खात्यात लिहा: उधारी कशी मागायची.
जमा खर्च कसा लिहावा: 6 स्टेप
नवीन पान, सुरुवातीची शिल्लक
वर तारीख लिहा. जमा बाजूच्या (डावीकडे) पहिल्या ओळीत सुरुवातीची शिल्लक: कालची अखेरची शिल्लक, रोख आणि बँक वेगळी.
पैसे आले: जमा बाजू
रोख विक्री, UPI आणि कार्ड विक्री, जुनी उधारी वसूल, इतर उत्पन्न: प्रत्येक त्याच वेळी, रक्कम आणि तपशीलासह.
पैसे गेले: खर्च बाजू
मालाचे पेमेंट, भाडे, पगार, लाईट बिल, चहा-नाश्ता, टेम्पो, मालकाची उचल, माल परत केल्याचे पैसे. बँकेत रोख भरली तर दोन्ही बाजूला.
उधारीवर दिलेला माल वेगळा
ज्या बिलाचे पैसे आले नाहीत ते रोखीत नको; ग्राहकाच्या खात्यात (उधारी यादी) लिहा. पैसे आले की जमा बाजूला “उधारी वसूल”.
अखेरची शिल्लक आणि बेरीज
रात्री अखेरची शिल्लक = जमेची बेरीज − खर्चाची बेरीज. ती खर्च बाजूला शेवटी लिहा, म्हणजे दोन्ही बाजूंची बेरीज सारखी होते.
गल्ला मोजून जुळवा
गल्ल्यातल्या नोटा आणि नाणी मोजा. मोजलेली रोख अखेरच्या रोख शिल्लकीइतकीच हवी; फरक आला तर त्याच रात्री कारण शोधा.
जमा खर्च वही, बिल बुक आणि ॲप: काय कुठे?
| काम | कागदी वही / Excel | Tap & Bill |
|---|---|---|
| रोजची विक्री (रोख, UPI, कार्ड) | बिलं मोजून हाताने बेरीज | प्रत्येक बिलातून आपोआप, “विक्रीचा आढावा” मध्ये |
| उधारी दिली आणि वसूल | वेगळ्या खात्यात | “उधारी बाकी” यादी; “वसूल करा” ने बाकी कमी |
| गल्ल्याचा मेळ | नोटा मोजून वहीतल्या रोख शिल्लकीशी | “गल्ला (दिवस बंद)”: गल्ल्यात किती असायला हवे आणि फरक (प्रत्येक प्लॅनमध्ये) |
| दुकानाचे खर्च | वहीत | “खर्च”: भाडे, लाईट बिल, चहा / नाश्ता, वाहतूक, पगार… (Basic पासून) |
| बँकेच्या नोंदी, पुरवठादाराचे पेमेंट | वहीत | पूर्ण बँक हिशोब नाही; पुरवठादारांचे बिल आणि चेक वेगळ्या रजिस्टरमध्ये |
| वर्षाचा हिशोब (P&L) | CA | नाही: CA साठी Excel / CSV रिपोर्ट मिळतात |
गल्ल्याचा मेळ असा चालतो: Android ॲपमध्ये “जुनी बिले” टॅबमधून “दिवस बंद करा (गल्ला मोजा)”, किंवा कॉम्प्युटरवर मेनूमध्ये “गल्ला (दिवसाचा हिशोब)”. नोटा मोजा किंवा एकूण लिहा, “आज गल्ल्यातून दिले” मध्ये चहा, टेम्पो, हमाली लिहा, “उद्यासाठी गल्ल्यात ठेवा” मध्ये उद्याची सुट्टी रक्कम, आणि “दिवस बंद करा”. मालकाला दिसतं: सुरुवातीची रोख + रोख विक्री + रोखीत मिळालेली उधारी − रोख परत (रिटर्न) − गल्ल्यातून खर्च = असायला हवे, आणि मोजलेल्याशी फरक. स्टाफने गल्ला मोजला तर त्याला अपेक्षित रक्कम दिसत नाही; मालकाला दिसते.
लक्षात ठेवा
- प्रत्येक व्यवहार त्याच वेळी लिहा; संध्याकाळी आठवून लिहिलं की खर्च राहून जातात.
- मालकाने घरासाठी घेतलेले पैसे “उचल” म्हणून लिहा, खर्च म्हणून नाही.
- चूक झाली तर खाडाखोड करू नका: चुकीच्या ओळीवर एक रेघ ओढून बाजूला बरोबर रक्कम लिहा.
- हा नमुना दुकानासाठी आहे. सोसायटी, बचत गट किंवा ग्रामपंचायतीच्या जमा खर्चाचे नियम आणि नमुने वेगळे असतात.